पद्मा नदी
पद्मा नदी : बांगला देशातून वाहणाऱ्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा (जमुना) यांचा, मेघना नदीला मिळेपर्यंतचा आग्नेयवाही संयुक्त प्रवाह. लांबी सु. १२० किमी. प. बंगाल राज्याच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूरच्या ईशान्येस सु. आठ किमी. वर, गंगा नदी भागीरथीहुगळी व पद्मा-मेघना अशी द्विशाखी होते.